माहितीची देवाणघेवाण

प्रत्येकाने माहितीची जबाबदारी घेतली पाहिजे, हि माहिती – आधारित संस्थेची मुख्य गरज आहे. अश्या प्रकारच्या प्रणालीचे मुख्य स्पष्टीकरण असे आहे कि, प्रत्येकाने ह्या संस्थेत कोण व्यक्ती, कोणत्या माहिती साठी माझ्यावर अवलंबून आहे ? असे विचारावे आणि पर्यायाने मी स्वतः कोणावर अवलंबून आहे ?. प्रत्येक माणसाच्या यादीमध्ये नेहमीच त्याच्या वरिष्ठांचा आणि कनिष्ठांचा समावेश असेल. परंतु या यादीमध्ये सर्वात महत्वाची नावे म्हणजे सहकारी कामगारांचे असतील आणि अशा माणसांचीही नावे असतील, कि ज्यांचाशी प्राथमिक संबंध हा परस्परांशी समन्वयाचा आणि सहकार्याचा असेल.

प्रत्येक संस्थे मध्ये, योग्य वेळी, योग्य माणसांना, योग्य माहिती मिळावी या साठी माहितीची जबाबदारी प्रत्येकाने घ्यावी.