Experience (Marathi)

कोणत्याही उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनासाठी स्वतःचा वॆयक्तिक अनुभव हा पुरेसा नसतो. अनुभव हाच व्यापाऱ्यांचा मुख्य मार्गदर्शक आणि शिक्षक असला पाहिजे अशी सर्वसामान्यपणे भ्रामक कल्पना आहे, कि जी नेहमी आणि प्रत्येक ठिकाणी विकासात अडथळाच निर्माण करत असते.

पूर्वी केलेल्या कामांची माहिती म्हणजेच अनुभव होय. अनुभव म्हणजे भविष्य काळाला नव्हे तर भूतकाळाला सामोरे जाणे होय. त्याच्या मुळे नियमित असा रोजचाच रटाळपणा आणि सुस्ती निर्माण होते.

ठराविक वेळे पर्यंत ते आवश्यक असते. पण जेव्हा त्याचे अंधपणाने अविचाराने अनुकरण केले जाते, तेव्हा तो मृतवत आणि अडथळा बनतो. तो विकासात अडचण बनतो. अलीकडच्या काळात उदयास आलेल्या नवीन परिस्थितीचा आणि वस्तुस्थितीचा विचार करता, प्रत्येक वेळी आणि प्रत्येक क्षणी अनुभवाच्या जोरावर स्थापन केलेल्या पद्धती पारखल्या पाहिजेत व प्रश्नोत्तरीत केल्या पाहिजेत.

अति अनुभवामुळे अनेक उद्योगधंदे लयास गेलेले आहेत किंवा अगदी नष्टही झालेले आहेत. प्रत्येक व्यापारी हे जाणतो. जर संशोधन आणि अनुभव हे दोघेही हातात हात घालून बरोबर चालले तर सर्वांचे कल्याण होईल. परंतु केवळ अनुभवाच्या जोरावर चालवला जाणारा उद्योग धंद्याला उतरती कळा लागण्याचा धोका जास्त असतो.

अनेकदा मनुष्य म्हणतो ” मला माझा उद्योग धंदा माहित नाही आहे का? ” , ” मी गेली ३० वर्ष तिथे काम केलेले नाही आहे का? “. ह्या प्रश्नांचे उत्तर असे आहे कि, त्याला त्याच्या व्यापार धंद्याचा पूर्वापार रीतीरिवाज म्हणजेच पारंपारिक भाग माहिती असतो. त्याने निश्क्रियतेने त्याच्या धंद्याच्या प्रचलित संकल्पना आणि कार्यपद्धती स्वीकारल्या असतात, परंतु त्याने त्या संकल्पना योग्य होत्या का ? आणि त्या कार्यप्रणालीत सुधारणा करणे शक्य होते का ? असा अभ्यास त्याने कदापीही केलेला नसतो.

खरी वस्तुस्थिती अशी आहे कि, शिकण्याची इच्छा नसलेल्या लोकांना शिकवणे खूप कठीण असते. जेव्हा श्री हेन्री फोर्ड ह्यांना नवीन अखंड उत्पादन प्रक्रियाद्वारे काचेचे उत्पादन करावयाचे होते, तेव्हा त्यांनी काहीही अनुभव नसलेल्या लोकांना नियुक्त केले होते. आणी जेव्हा श्री हर्टझ ह्यांना त्यांच्या पिवळ्या टेक्सी कॅबसाठी विनम्र वाहन चालक हवे होते, तेव्हा त्यांनी पूर्वी कधीही वाहन चालवण्याचा अनुभव नसलेल्या माणसांना वाहन चालक म्हणून नेमले होते.