विभिन्नता किंवा मरण

विभिन्नते शिवाय गत्यंतरच नाही. तो आपल्या सर्वांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे.

सफरचंद हे त्याच्या सर्वसाधारण रचनेमुळे आणि इतर महत्वपूर्ण गुणधर्मांमुळे इतर फळांपेक्षा वेगळे असते.

“ इंटेल “ कंपनी द्वारे सातत्याने कमीत कमी किमतीत जास्त शक्तीचा मायक्रोप्रोसेसर उपलब्ध करून देण्याच्या तिच्या क्षमतेमुळे, ती कंपनी इतरांपेक्षा वेगळी ठरली आहे.

“ डेल “ कंपनी कडे पुरवठा साखळी बाबत असलेल्या ज्ञानामुळे, ती कंपनी इतरांपेक्षा वेगळी ठरली आहे.

सौंदर्य आणि कृतीवाद ह्या दोघांना एकत्र आणण्याच्या क्षमतेमुळे “ दि बॉडी शॉप “हि कंपनी इतरांपेक्षा वेगळी ठरली आहे.

कमीत कमी किमतीत अधिक कार्यक्षम आणि सुखकर हवाई प्रवास देणे ह्या संकल्पनेमुळे “ जेट ब्लू “ हि कंपनी इतरांपेक्षा वेगळी ठरली आहे.

खालील सहा क्षेत्रांवर लक्ष्य केंद्रित करून भिन्नता आणता येते.

१, आपल्या कार्यक्षेत्रावरच लक्ष्य केंद्रित करा. तुमचे कार्यक्षेत्र काय असेल ह्याबाबत प्रश्न विचारून जाणून घ्या.

२. योग्य साधने वापरा आणि अत्याधुनिक यंत्र सामग्री खरेदी करा.

३. तुमच्या कार्य पद्धतीचे शास्त्र ठरवा आणि त्या प्रमाणे तुमच्या कार्य प्रक्रिया निश्चित करा. तुमच्या कार्य पद्धतीच्या शास्त्रा नुसार काम करणे हा तुमचा विशेष मार्ग आहे. त्या कार्य पद्धतीच्या शास्त्राच्या शक्तीमध्ये अपेक्षित यश मिळवण्याची क्षमता आहे.

४. गुणवत्ता : गुणवत्तेवर लक्ष्य केंद्रित करणारे उदयोग असा विश्वास करतात कि, जेव्हा तुम्ही शेवटच्या परिणामा पेक्षा फक्त प्रक्रीयावर जास्त लक्ष केंद्रित करण्यास सुरवात करतात, तेव्हा तुम्ही गुणवत्ता युक्त उत्पादन देऊ शकतात. प्रक्रीयावर जास्त लक्ष केंद्रित करणारे उद्योग हे गुणवत्ता पूर्ण उदयोग असतात.

५. नवीन उपक्रम : सातत्याने नवीन चालीरीती अथवा नाविन्यपूर्ण कल्पकता आणि वेगवेगळ्या साधन सामग्री मार्फत राबवण्यात येणाऱ्या नवीन उपक्रमांची क्षमता म्हणजेच कल्पकता होय. कंपन्या आपल्या ग्राहकांच्या ग्राहकांवर लक्ष्य केंद्रित करीत आहेत.

६. ब्रानडिंग : योग्य दर्जा व मोबदल्याचे अभिवचन.

जर तुमच्या उत्पादनामध्ये इतरांपेक्षा फरक असेल, तर तुमच्या मध्ये तो फरक दर्शविण्याची क्षमताही असली पाहिजे. हा फरक वास्तविक स्वरुपात ( उदा. अविद्राव्य ऐसप्रीन पेक्षा विद्राव्य ऐसप्रीन ) किंवा काल्पनिक स्वरुपात ( इतरांपेक्षा आपल्या अत्तराचा सुगंध समोरच्या माणसाला जास्त आकर्षित करणारा आहे ,असे जाहिरातीच्या माध्यमातून सूचित करणे ) असावा. तथापि पुराव्या अभावी फरक असल्याचा दावा करणे महणजे केवळ फक्त दावाच असतो.

जर तुम्ही इतरांपेक्षा वेगळे उत्पादन बनविले असेल, तर तुम्हाला हा फरक दर्शविण्याची गरज असते. तुमच्या संवादातील प्रत्येक पैलू मध्ये तुमची भिन्नता प्रतिबिंबित झाली पाहिजे. तुमची जाहिरात, तुमची हस्त पुस्तिका, तुमची वेबसाईट, तुमचे विक्री विषयीचे सादरीकरण ई. तुम्ही तुमची भिन्नता एका ठराविक मर्यादेच्या पलीकडे जाऊन व्यक्त करू शकत नाही. म्हणून तुमची भिन्नता दर्शवणारी कल्पना हि शक्य तेवढी साधी, सोप्पी आणि डोळ्यांना सहजपणे स्पष्ट दिसणारी म्हणजे दृश्य असावी.

वरिष्ट व्यवस्थापनाने विभिन्नते बाबतच्या डावपेचांची कला व शास्त्र तयार केले असल्याची खात्री करून, प्रदर्शित केले पाहिजे आणि सातत्याने सुरक्षितपणे चालू ठेवले पाहिजे.

कोका कोलाचे सी.ई.ओ.स्वर्गवासी रौबर्ता गोईझुएटा म्हणतात कि, स्थावर मिळकतीमध्ये फक्त ठिकाण, ठिकाण, ठिकाण आणि व्यवसायामध्ये फक्त विभिन्नता, विभिन्नता, विभिन्नता ह्यांनाच महत्व असते.

एकदाका विभिन्नते बाबतची व्यूहरचना ठरली कि, कामगार त्यांची खरी क्षमता दाखवायला सुरवात करतात. त्यासाठी त्यांनी ” माझ्या कंपनीमध्ये कोणती भिन्नता आहे ? ह्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. काही गोष्टी बंद करा आणि काही गोष्टी मिळवण्यासाठी धावा असे ह्या प्रश्नाच्या उत्तरातून त्यांना समजते. एखाद्या जबरदस्त प्रभावी लक्षवेधक कल्पने शिवाय जगातील लोकांचे कौशल्य आणि सर्व प्रेरणा तुम्हाला मदत करू शकणार नाही.

विभिन्न कल्पनेचे हत्यार वापरूनच तुम्ही खर्या प्रेरणेला सुरवात करू शकता. नंतर तुम्ही तुमच्या गटातील मंडळीना आव्हान करू शकता कि, विक्री, उत्पादन विकास, अभियांत्रिकी, ह्या सारख्या रोजच्या जीवनातील घटकांमध्ये विभिन्नता अंमलात आणा. ( आणि त्याची भरभराट करा )

तुम्ही तुमच्या भावी अपेक्षित ग्राहकाच्या मनामध्ये तुमच्या उत्पादना बाबतची भिन्नता अथवा फरक कसा बिंबवतात,हि खरी व्यवहार स्थिथि आहे. कंपनीस मजबूत कोण करते, तर त्या उत्पादन किंवा सेवा नसतात. तर ती वस्तुस्थिती असते, कि जी मनामध्ये घर करून बसलेली असते. या वस्तुस्थितीच्या मागे असलेली मुख्य कल्पना हि सी.ई.ओ.च्या कसोटीतून उत्तीर्ण झाली पाहिजे. ” हि संस्था कशा बद्दल इतरांपेक्षा वेगळी आहे ” ? असा प्रश्न सी.ई.ओ.ना विचारल्यास ते काय म्हणतील.

तुमच्या मूळ ओळखीच्या अथवा अस्तित्वाच्या पलीकडे वृद्धी होणे, हे त्या संस्थेसाठी हानिकारक असते. तुम्ही ज्या गोष्टींसाठी नावाजलेले आहात अथवा परिचित आहात, त्या व्यतिरिक्त तुम्ही तुमची ओळख करून देत असाल, तर त्यामुळे तुमचे विशेष अस्तित्व अथवा ओळख हळूहळू धोक्यात येते अथवा नष्ट होण्यास सुरवात होते.

विभिन्न कल्पना अंगीकारत असतांना, काही वेळेस वृद्धीचा बळी देणे काही अंशी चांगले असते. जसे,

१. प्रत्येकाच्या दृष्टीकोनातून प्रत्येकासाठी एका प्रकारच्या उत्पादनावर लक्ष्य केंद्रित करत राहणे हे केव्हाही फारच चांगले असते.

२. एखाद्या उत्पादनाचे अनेक विशेष गुणधर्माचे वर्णन सांगण्यापेक्षा, त्या उत्पादनाच्या एका विशेष गुणधर्माच्या वर्णनावर लक्ष्य केंद्रित करत राहणे हे केव्हाही श्रेष्ठ आणि चांगले असते.

३. एका वर्गातील एका विभागावर लक्ष्य केंद्रित करत राहिल्यास, तुमचे त्या विभागातील विशेष पसंद केले जाणारे उत्पादन ठरू शकते.