अनेक माणसे ठासून सांगतात कि, त्यांना जन्मताच अंत प्रेरणा असते, कि जिच्या मूळे ते समंजस निर्णय घेण्यासाठी सक्षम असतात. त्यांना ज्ञाना साठी पर्यायी व्यवस्था असते, कुठल्याही विशेष तज्ञा पेक्षा, व्यावहारिक ज्ञानाने ते उच्च पातळीवर असतात. ते स्वावलंबी असतात. त्यांना अचूक पणाची ईश्वरी देणगीच प्राप्त झालेली असते.

अशा प्रकारचे विचार असणे म्हणजे हा केवळ मूर्खपणाच असून दुसरे काहीच नाही. आणि वैज्ञानिक जगात हे केवळ अज्ञान आहे.

एखांदा माणूस त्याच्या कामात विशेष तज्ञ असू शकतो परंतु त्याच्या जीवनात तो विशेष तज्ञ असू शकत नाही. त्याला असंख्य रुची आवडी असायला हव्यात. त्याने त्याच्या पिढीशी संपर्कात असायला हवे. त्याने त्याच्या जीवनाचा समतोलपणा विविध कार्य सोबत राखला पाहिजे.

जेव्हा एखाद्या माणसाला त्याच्या स्वतःच्या जीवनातील विविध शक्यता आणि संधीज ह्या बद्दल आवड निर्माण होते आणि जेव्हा तो आपण जास्तीत जास्त बुद्धिमान आणि कर्तुत्ववान व्हावे असे ठरवतो, तेव्हा त्या माणसाच्या जीवनाच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरवात होते.

स्वतःच्या मालकीची मालमत्ता असणे हे माणसाची अब्रू ,प्रतिष्टेच्या व चरित्राच्या दृष्टीने फायदेशीर असते. त्यामुळे अशा माणसाचा आनंद द्विगुणीत होतो. त्यामुळे अशा माणसाची त्याच्या कुटुंबात, नातेवाईक आणि व्यापारी मंडळीमध्ये मानसन्मान आणि प्रतिष्टा वाढते.

वयाच्या ४० व्या वर्षी माणसाने स्वतःच्या स्वभावाचा लक्ष देऊन बारकाईने आढावा घेतला पाहिजे. त्याने त्याच्या चुकांपासून स्वतः धडा घेतला पाहिजे आणि कुठल्या प्रकारचे काम तो स्वतः जास्त चांगल्या प्रकारे करू शकतो, त्यात त्याने प्राविण्य मिळवले पाहिजे. काही गोष्टी अशा आहेत कि, ज्या तो करूच शकत नाही त्या गोष्टी वयाच्या ४० व्या वर्षी नक्कीच त्याच्या लक्षात यायला लागतात. तसेच विशिष्ट काम तो चांगल्या प्रकारे करू शकतो. तो त्याचा मजबूत मुद्दा असू शकतो.

कोणत्याही माणसाकडे हव्याशा असणाऱ्या तीन उल्लेखनीय महत्वाच्या गोष्टी पुढील प्रमाणे आहेत :-

ज्ञान – माहिती

दयाळूपणा

धन संपत्ती

जर आपण आपल्या पैशाच्या माधमातून जास्त बुद्धिमान आणि उदार दानशूर होऊ शकलो नाही, तर आपण गरीब राहणे केव्हाही चांगले असू शकते.

कुठल्याही देशाची वैभवशाली महानता हि त्यांच्या नौदल, भूदल, किंवा सरकार वर अवलंबून नसते, तर ती त्या देशाच्या पूर्ण विकसित लोकसंख्येवर अवलंबून असते.

संघर्ष किंवा मतभेद आणि द्वेष निर्माण करणाऱ्या माणसाला नेहमीच गंभीर अडचणींना सामोरे जावे लागते. सहकारी कामगार आणि ग्राहका बरोबर सुरळीतपणे आणि समाधानाने काम करणे हाच काम करण्याचा योग्य मार्ग आहे.

काही माणसे फक्त नाटकी असतात, कि जे फक्त आवडत्या विषयावरच काम करत असतात, आणि तेव्हाच ते आनंदी असतात. करमणूक करणाऱ्या कामा व्यतिरिक्त इतर कामे त्यांना आवडत नसतात.

जेव्हा एखादा माणूस संस्थेसाठी काम करीत असतो, तेव्हा त्याला त्याच्या संस्थेच्या प्रमुखाने दिलेल्या कल्पना अंमलात आणल्या पाहिजे. संस्थेच्या हितासाठी भवितव्यासाठी करावयाचे कुठलेही काम करतांना त्याच्या कडे उत्साह असला पाहिजे.