स्वयं प्रावीण्य हे मोठ्या प्रमाणावरील उत्पादन किंवा विक्रय कला किंवा जाहिरात किंवा अर्थव्यवस्था इतकेच महत्वाचे आहे.

म्हणजे त्याचा अर्थ असा कि, माणसाला त्याच्या भावना व विचारांवर नियंत्रण असावे लागते, माणसाने स्वतःच्या स्वभावातील उणीवांवर मात केली पाहिजे, माणसाने आत्मविश्वास संपादन करून समतोल साधला पाहिजे.

जर एखादा माणूस स्वतःची इच्छा, क्रोध, वासना, भीती, मनस्थिती आणि सवयी नियंत्रित करू शकत नसेल, तर तो माणूस इतर माणसांवर नियंत्रण ठेऊ शकत नाही. असा माणूस हवेच्या धक्क्याने इकडून तिकडे जाणारया जहाजात बसून जलप्रवास करणाऱ्या माणसा सारखा असतो. असा माणूस मोठ्या महासागरातील जहाजा प्रमाणे नसतो, कि जे जहाज स्वतःला नियंत्रित करणाऱ्या अंतर्गत शक्तीच्या माध्यमातून न डगमगता सरळ मार्गाने पुढे जात असते.

स्वयं कौशल्याला अवघड वळणावरच्या ठिकाणी सुरवात होते. नंतर असा माणूस प्रवाहा विरुद्ध जाऊ लागतो. तो त्याची भीती आणि त्याच्या आळशीपणावर मात करतो आणि सरळ पुढे जायला सुरवात करतो. तो स्वतःच्या अंतर्गत मानसिक शक्तीचा विकास करू लागतो. तो आपले उद्दिष्ट्ये आणि कार्यप्रणाली निश्चित करतो. ती स्वतः आत्मसात करतो. तो स्वतःमध्ये कौशल्य निर्माण करतो. ती एक आपल्या जीवनातील मोठ्या चांगल्या कारकिर्दीची सुरवात असते. इच्छाशक्तीच्या आणि प्रयत्नांच्याद्वारे तो स्वतःला पूर्ण संघटीत करतो. तो अधिक क्रियाशील आणि गतिमान होतो. त्याला जे करावेसे वाटते ते तो करतो. तो लोकांबरोबर प्रवाहाच्या दिशने वाहत जाणे थांबवितो. त्याने सुकाणू घट्ट पकडला आहे. त्याने ठराविक कार्याकडे वळायला सुरवात केली आहे. त्याने असे संशोधन केले आहे कि,त्याची इच्छाशक्ती हि एखाद्या यंत्राप्रमाणे आहे असे त्याला जाणवायला लागते. त्याला अशा अंतर्गत शक्तीचा साक्षात्कार झाला आहे कि, जी शक्ती त्याला विकासाच्या वाटेवर पुढे घेऊन जाते. जो माणूस स्वतःच्या मनातील भीती आणि स्वतःच्या मुल्यांचा र्हास रोखण्यासाठी अचानकपणे धाडसी निर्णय घेतो, अशाच माणसाकडे हे सर्व येऊ शकते आणि ह्याची सुरवात एका क्षणाच्या हिमतीने धेर्याने घेतलेल्या निर्णयाने होऊ शकते.

आपल्या स्वतः मधील विश्वास वृद्धिंगत करण्यासाठी हाच मार्ग आपला आहे असा माणसाने ठाम निश्चय करावा. शंका आणि भीतीमुळे मन सुस्त राहते आणि गोंधळलेले मन नवीन आवडी निवडींचा पाठलाग करून त्यांना हद्दपार करते. मनामध्ये नवीन कल्पना विचार आणि उद्दिष्ट्ये येतात आणि त्यामुळे त्यांची इच्छाशक्ती वाढते. जसा एखादा कार्यक्षम कारखाना व्यवस्थापक तोट्यात चाललेला अस्ताव्यस्त कारखाना चालवायला घेतो आणि तिला नफा मिळवून देणारा कारखाना बनवितो तसे, हि इच्छाशक्ती अंतर्गत बुद्धीला ओळखू लागते.

माणूस तरुण असो कि वयोवृद्ध, प्रत्येक गोष्ट हि त्याच्या वेयक्तिक कौशल्यावर अवलंबून असते.

कौशल्य प्राप्त करण्यासाठीची पहिली पायरी म्हणजे मेंदूला सक्रीय करणे होय. त्यासाठीचा सोप्पा मार्ग म्हणजे उदबोधक माहितीपूर्ण पुस्तकांचा अभ्यास करणे, कोणतेही अवघड काम करण्याचा प्रयत्न करणे आणि निरीक्षण करण्याची कला शिकणे होय. जेव्हा माणसाला विचार करण्यासाठी काहीही नसते, तेव्हा ते त्यांच्या एकटेपणाची भावना आणि उणीवा किंवा लक्षणं ह्यांचा विचार करू लागतात. ते अंमली पदार्थांचे सेवन करण्यास सुरवात करतात. ते आरोग्य मनस्वास्थ ह्यावर विचार करण्याऐवजी दुखण्यावरच विचार करू लागतात.

जेव्हा माणूस अचानकपणे स्वतःच्या बुद्धीची स्तुती करू लागतो आणि तो त्याच्या साठी काम करू शकतो हे जाणून घेतल्यावर माणसाच्या यश प्राप्तीला सुरवात होते. खंबीर माणसाने दुसरे लोक त्यांच्या मुळे घाबरणार नाहीत ह्याची पुरेशी काळजी घ्यावी. प्रबळ माणसामध्ये उद्धटपणा किंवा हुकुमशाही नसते. माणसांवर कुठल्याही कामाची बळजबरी न करता किंवा त्यांना धाक दाखवून ताब्यात न ठेवता, त्यांना जिंकता आले पाहिजे. परंतु निश्चितपणे त्यांना क्षुद्र असल्याची भावना मनात निर्माण होता कामा नये. आपण माणसांचे व्यवस्थापन करत असलो किंवा वस्तू विकत असलो, तरी आपण शांत आणि समजूतदार असणे केव्हाही चांगले असते.

माणसाने त्याचे जीवन असे नियंत्रित करावे, कि त्यामुळे त्याला जीवनात जास्त आराम मिळू शकेल. त्यांनी त्यांच्या योग्य सवयी निवडाव्यात आणि त्या त्यांनी स्वतःवर लादू नयेत. थोडक्यात सारांश म्हणजे माणसाने त्यांचे जीवनात काय करायचे ठरवले आहे त्या नुसार त्यांनी त्यांचे संपूर्ण जीवनात अनुरूपता आणावी.

कुठल्याही माणसाने अद्याप पावेतो त्याचे पूर्वग्रह दुषित मन साफ केले नाही, परंतु कमीत कमी त्याला तो अनेक गोष्टींमध्ये पूर्वग्रह दुषित असतो हे माहित असायला हवे. त्याने स्वतःला मूर्ख बनवू नये. त्याने इतर लोकां प्रमाणे त्याच्या पुर्वग्रहाची सवय करून घेऊ नये.

अनेक माणसे अशी असतात, कि जी त्यांचे कार्य पूर्ण न करता मरतात, त्यांचे हे अपयश त्यांना यशाकडे घेऊन जात नाही. परंतु ते आशा आणि प्रयत्नांद्वारे नेहमीच आनंदी असतात. उपयुक्त असे काही तरी करण्याच्या चिकाटीने कुठल्याही अडचणींना न जुमानता ते त्यांचा स्वतःचा स्वभाव सुसंस्कृत आणि परिपक्व करतात. मोठा धनिक श्रीमंत होण्यासाठी त्यांचे कडे वेळ नाही, असे बहुतकरून त्यांनी ठरविलेले असते.

प्रत्येक बुद्धीवादी माणसाच्या धेय्यामध्ये अस्सलपणा असला पाहिजे. पाकमत्स्या पासून माणसा पर्यंत झालेली सर्व प्रगती हि त्यांच्यातील परिस्थिथिनुसार असलेल्या भिन्नतेमुळे झाली आहे हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. प्रत्येक पाकमत्स् हा दुसऱ्या पाकमत्स्या सारखा असता, तर मानवी स्पर्धा मुळीच अस्तित्वात राहिली नसती. स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणणारा प्रत्येक माणूस हा प्रगतीच्या दिशेने जात असतो. हाच प्रगतीचा नियम आहे.

सातत्याने नाविन्यपूर्ण गोष्टी करत राहणे ह्या पेक्षा चांगले पुष्टीकारक औषध कुठल्याही माणसाच्या मनासाठी असू शकत नाही. ज्या क्षणी माणसाने काहीतरी नवीन करण्याचे ठरविले, त्या क्षणापासून तो यंत्रा प्रमाणे काम करणारा माणूस राहत नाही. तो विचार करणारा माणूस बनतो. त्याचे डोळे उघडतात. रक्त प्रवाह मेंदूकडे वाहू लागतो. त्याचे जीवन आणखीनच सुलभ बनते.

काहीच नसल्यापेक्षा काहीतरी असण्यासाठी काही माणसे किती सहनशीलतेने मेहनत कष्ट करीत असतात. स्वतःच्या प्रयत्नाद्वारे काहीतरी मिळवण्यासाठी धडपड करणे हाच फक्त प्रगतीच्या दिशेने पुढे जाण्याचा मार्ग आहे.